डीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदान

डीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी (प्रतिनिधी) - इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागप्रमुख प्रा. पी.एस. जाधव यांना संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा.जाधव हे गेली १६ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘स्टडी ऑफ अ‍ॅपेरिएल प्रेफरेन्सेस अ‍ॅण्ड बायिंग बीहेव्हिएर ऑफ मिडल एजड वूमेन’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी संजय घोडावत विद्यापीठाच्या, कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट विभागाच्या डिन डॉ. वाय.एल.गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.

पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आ. प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे  व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील उपस्थित होते.