भाऊसिंगजी रोडवरील 'झेडपी कॉम्प्लेक्स' विकसित करणार- सभापती सारिका नांदेकर

भाऊसिंगजी रोडवरील 'झेडपी कॉम्प्लेक्स' विकसित करणार- सभापती सारिका नांदेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी भाऊसिंगजी रोडवरील 'झेडपी कॉम्प्लेक्स' लवकरच विकसित करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सभा सभापती नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. सभेचे सचिव आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांनी स्वागत करून विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

 सभेमध्ये गडहिंग्लज येथील खाऊ गल्लीतील दुकान गाळ्यांची फेरनिविदा प्रक्रिया राबवणे, रस्ते विकास जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण, एसी बसवणे आणि जुने वायरिंग बदलणे आदी कामांचा आढावा घेण्यात आला, तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तालुकास्तरावरील विश्रामगृहांची दुरुस्ती करून ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले.

 यावेळी सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, इंद्रजीत पाटील, अमरसिंह पाटील, संभाजी पाटणकर, काकासाहेब सरूडकर, शिरीष देसाई, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह समिती सदस्य, उपअभियंते उपस्थित होते.