अशोकराव माने पॉलिटेक्निकला ''एक्सलंट'' मानांकन

अशोकराव माने पॉलिटेक्निकला ''एक्सलंट'' मानांकन

वाठार (प्रतिनिधी) : अशोकराव माने पॉलिटेक्निकने शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक महत्त्वकांक्षी टप्पा गाठत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या बाह्य शैक्षणिक आवेक्षणामध्ये एक्सलंट मानांकन प्राप्त केले.

या मानांकनामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक नियोजन, आधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, प्रशिक्षण व प्लेसमेंट, तसेच गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची राज्यस्तरावरील समितीने दखल घेत पॉलिटेक्निकला उत्कृष्ट श्रेणी बहाल केल्याची माहिती संस्थाअध्यक्ष व केडीसीसी संचालक श्री विजयसिंह माने यांनी दिली.

नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक कौशल्य विकसित होण्यासाठी कॉलेजने प्राधान्य दिले आहे. अभ्यास दौरे, औद्योगिक प्रशिक्षणावर भर व त्यातून उद्योग संवाद घडविला जातो. प्रात्यक्षिक शिक्षणाला आधुनिक प्रयोगशाळेची उपलब्धता करून तांत्रिक पद्धतीच्या सखोल अभ्यासाचे 

उत्तम नियोजन, अध्ययन व अध्यापन पद्धतीतील सूक्ष्म नियोजन, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाची जोपासना, नोकरीची हमी देत शंभर टक्के प्लेसमेंट, सर्वोत्तम निकालाची परंपरा याची पाहणी करून हे मानांकन प्राप्त झाले आहे.

हे यश संस्थेच्या व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समर्पित कार्य, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा यांचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था अधिक जोमाने कार्यरत राहील असे मत प्राचार्य डॉ. युवराज गुरव यांनी यावेळी व्यक्त केले.

या यशामुळे अशोकराव माने पॉलिटेक्निकची महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य संस्थांमध्ये नोंद झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दलचे अधिकृत मानांकन पत्र संस्था अध्यक्ष मा. विजयसिंह माने व संस्थेच्या संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. युवराज गुरव यांना सुपूर्द केले.

यावेळी अकॅडमीक कोऑर्डिनेटर प्रा. प्रदीप हसबे, डॉ. सुहास लकडे, प्रा. एस आय मुल्ला, डॉ. भरत घाटगे आदी उपस्थित होते.