आठवड्यापूर्वी गर्भपात; निवृत्त न्यायाधीशांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये धक्कादायक खुलासा

आठवड्यापूर्वी गर्भपात; निवृत्त न्यायाधीशांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये धक्कादायक खुलासा

दिल्ली (प्रतिनिधी) : नोएडा येथे राहणाऱ्या त्विषा शर्मा (वय ३३) हिचा लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. भोपाळस्थित वकील समर्थ सिंह यांच्याशी त्यांचा डिसेंबर २०२५ मध्ये विवाह झाला होता. समर्थचे वडील निवृत्त न्यायाधीश असून आई गिरीबाला सिंह याही माजी न्यायिक अधिकारी आहेत. त्विषाचा सासरी छळ झाला,असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा सासरच्यांविरुद्ध दाखल केला होता. १२ मे रोजी संध्याकाळी ८ च्या सुमारास त्विषा शर्मा मृत्यू झाला होता. आता त्विषा शर्माचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. गळफासामुळे त्विषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आला आहे. त्विषाच्या हातालाही झाली आहे. दुखापत अहवालानुसार १ आठवड्यापूर्वी गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. 

 त्विषा शर्माच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, आता पोस्टमार्टम (शवविच्छेदन) रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भोपाळमधील मॉडेल त्विषा शर्माच्या मृत्यूच्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. 'एम्स' (AIIMS) भोपाळच्या रिपोर्टमध्ये त्विषाचा मृत्यू फाशी लागल्यामुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. रिपोर्टनुसार, १२ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तसेच तिच्या हातावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. याशिवाय, मृत्यूच्या साधारण एक आठवड्यापूर्वी त्विषाचा गर्भपात झाला होता, अशी माहितीही रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

एम्स भोपाळच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्विषाचा मृत्यू म्हणजेच जिवंत असताना फास लागल्यामुळे झाला. डॉक्टरांना तिच्या गळ्यावर वरच्या बाजूला जाणारा 'लिगेचर मार्क' (फासाची खूण) आढळला, जो सामान्यतः फाशीच्या प्रकरणांमध्ये दिसून येतो. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गळ्याच्या आतील स्नायूंवर दबाव आणि रक्तस्त्रावाच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र, हायॉइड बोन (गळ्याचे हाड) आणि गळ्याची इतर हाडे सुरक्षित आढळली. डॉक्टरांच्या मते, शरीरावर कोणत्याही मोठ्या संघर्षाचे किंवा जीवघेण्या हल्ल्याचे निशाण मिळालेले नाहीत. तरीही, हातासह शरीराच्या काही भागांवर किरकोळ जखमा आणि ओरखडे नक्कीच आढळले आहेत. या जखमा कशामुळे झाल्या, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत.