कोल्हापुरातील चौंडेश्वरी हॉल मध्ये एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न

कोल्हापुरातील चौंडेश्वरी हॉल मध्ये एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सालाबादप्रमाणे याही वर्षी चौंडेश्वरी हॉल मंगळवार पेठ येथे एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आले होते. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव आणि पारिवारिक गुरुबंधू यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. चरित्र सामूहिक पारायणाचे हे 9 वे वर्ष असून भक्तीमय वातावरणात पारायण सोहळा संपन्न झाला. 

मार्गशीष महिन्यात गुरुचरित्र पारायण करणे, अत्यंत भाग्यदायी मानले जाते. यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.  पहाटे सहा वाजता पूजा आणि अभिषेक करून पारायणाला सुरुवात करण्यात आली तसेच संध्याकाळी आरती आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. पारायणासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावर्षी एक हजारांहून अधिक लोकांनी या पारायणाचा लाभ घेतला.

सागर जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण पार पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव,  माधुरी काटकर,  मुकुंद काटकर, यशस्विनी जाधव,आर्यनिल जाधव यांनी केले होते. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांचे कुटुंब, स्थानिक लोकं आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय यशस्वीरित्या पार पडले.