धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : NEET-UG परीक्षेतील वाद आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबद्दल कोणतीही खंत व्यक्त करण्यात आलेली नाही, तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी केल्याचा आरोप असलेल्या अत्याचारांचाही कुठेही उल्लेख नसल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय, आंदोलनात प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी होती. मात्र, राजीनाम्यात यासंदर्भात कोणतीही ठोस घोषणा नसल्याची टीकाही त्यांनी केली.
आंबेडकरांनी पुढे म्हटले की, हा राजीनामा म्हणजे प्रश्न सोडवण्याऐवजी परिस्थिती अधिक चिघळवणारा निर्णय आहे. परीक्षापद्धतीत सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार अद्याप ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलन मागे घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी, विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.