मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यास यापूर्वी 17 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. 

तथापि या कालावधीत अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना अर्ज सादर करण्यास 3 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली.