मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’? भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’? भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुंबई (प्रतिनिधी) : बीएमसी अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ झाल्याचा प्रकार समोर आल्याची चर्चा आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. बदल्यांशी संबंधित ‘रेट कार्ड’ची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे.

५ ऑगस्ट रोजी मागितलेल्या माहितीला २६ दिवस उलटूनही उत्तर देण्यात आलेलं नाही. अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यावर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही कोटेचा यांनी केला आहे. मागितलेली माहिती मिळाल्यास ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार उघड होईल, असा दावा त्यांनी केला आहे.या प्रकरणी आमदार मिहीर कोटेचा यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे तक्रार केली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच माहिती देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

बीएमसी अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. बदल्यांशी संबंधित ‘रेट कार्ड’ची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकूणच, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाला आता वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. पालिका अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये कुठेतरी ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ झाल्याचा आरोप होताना दिसत आहे.

या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यावर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कोटेचा यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी मिहीर कोटेचा यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.मात्र, पुन्हा एकदा बदल्यांवरून झालेल्या या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.