लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक

लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध टीव्ही कलाकार रोहित चंडेल याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय कलाकार मुलीचा पाठलाग करणे, तिला वारंवार फोन करणे, तिचा छळ करणे आणि तिच्यावर हल्ला केल्याप्रकरणी या अभिनेत्याला घाटकोपर पोलिसानी अटक केली आहे. या कलाकाराचे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अश्याच प्रकारे या अगोदर ही एक दुसऱ्या सहकलाकार बाबत त्याने असेच कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर या अगोदर ही दोन गुन्हे दाखल आहेत. 29 वर्षीय अभिनेता रोहित चंडेलने 'काशीबाई बाजीराव बल्लाळ'मध्ये बाजीराव आणि 'पांड्या स्टोअर'मध्ये धवल मकवाना यांची भूमिका साकारली होती.घाटकोपर पोलीस याचा पुढील तपास करीत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने रोहित चंडेलविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी अभिनेता वारंवार तिच्या मोबाईलवर फोन करत होता. एवढंच नाही, तर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत तिला त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, 5 जुलै रोजी रोहितने मुलीचा तिच्या घराजवळ पाठलाग केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वेळी त्याने शिवीगाळ करत मुलीला मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी आणि रोहित चंडेल यांची यापूर्वीपासून ओळख होती.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी रोहित चंडेलविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 78 आणि 115(2) अंतर्गत पाठलाग करणे आणि दुखापत केल्याप्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहितीनुसार, शुक्रवारी दहिसर येथील राहत्या घरातून रोहित चंडेलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.या घटनेमुळे रोहित चंडेलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप रोहित चंडेल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून तक्रारीतील सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.