शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची 'या' स्पर्धेसाठी निवड

शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची 'या' स्पर्धेसाठी निवड

जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी  राजल पटेल हिने ललित कला विभागातील पोस्टर या प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. नुकत्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे इंद्रधनुष्य २०२५ च्या निवड चाचणी संपन्न झाल्या. तिची विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

२१ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२५ या स्पर्धा दिनांक ५ व ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे स्पर्धा होणार आहेत. 

निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आ. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, राहुरी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी विलास आवारे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, संघ व्यवस्थापक प्रा. दादासाहेब मगदूम व पूजा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.