सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार याबाबत शरद पवारांचं मोठं विधान

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार याबाबत शरद पवारांचं मोठं विधान

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या आज ५ वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार याबाबत शरद पवार म्हणाले, मला याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला असावा, कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अशी काही नावे समोर येत आहेत. कदाचित त्यांनीच हा निर्णय घेतला असून पक्षपातळीवर अंतर्गत निर्णय घेतला असल्याचंही ते म्हणाले. 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर शरद पवार म्हणाले, ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोणीतरी पुढे यावे लागेल. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील या प्रक्रियेचे नेतृत्व करत होते. आता हे होईल की नाही हे स्पष्ट नाही. दोन्ही पक्ष एकत्र यावे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती.

राष्ट्रवादी पुढे काय करेल हा त्यांचा निर्णय असून मी याबाबत निर्णय घेणार नाही. सुनेत्रा पवार यांच्यासी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला असावा असंही शरद पवार यावेळी म्हणाले.