गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निदर्शने

गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निदर्शने

कोल्हापूर प्रतिनिधी  -आज कोल्हापूर शहरातील सदर बझार येथील गो गॅस कंपनीकडून 43रू असताना 80 रूपये दरवाढ करण्यात आली. ती आंतरराष्ट्रीय गॅस दरवाढीचे कारण सांगून.  तसेच या ठिकाणी असे सांगितले जात आहे कि या अनाधिकृत गॅस कंपनीकडून  केलेल्या दरवाढीला  जिल्हाधिकाऱ्यांकडून  पाठिंबा आहे असे सांगण्यात येत आहे.



त्यामुळेच गो गॅस 
अन्यायाविरुद्धात सदर बझार येथे रिक्षा वाहनासह आज रिक्षाचालक मालक यांनी महाराष्ट्र  नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजेत. रिक्षाचालकांच्या  एकजुटीचा विजय असो. अन्यायी दरवाढ रद्द झालीच पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा विजय असो. राजसाहेब ठाकरे चा विजय असो. या व अन्य घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.