रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? BCCI कडून टाईमटेबल जारी
दिल्ली (प्रतिनिधी) : बीसीसीआयने 2026-27 या कालावधीसाठी टीम इंडियाचा (Team India) घरच्या मैदानावरील क्रिकेट शेड्यूल जाहीर केलं आहे. पुढील एका वर्षात भारतात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या संघांचे दौरे होणार आहेत. या काळात टीम इंडिया 17 शहरांमध्ये एकूण 22 सामने खेळणार आहे. या शेड्यूलनंतर चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता आहे आणि ती म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा नेमकं कधी मैदानात दिसणार?

रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या मुख्यतः एकदिवसीय सामने खेळत असल्याने चाहत्यांना त्यांना पाहण्याची संधी मर्यादित असणार आहे. पुढील 12 महिन्यांत टीम इंडिया फक्त 12 वनडे सामने खेळणार आहे. IPL नंतर भारताचा पहिला एकदिवसीय सामना अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये होणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे विरुद्ध मालिकांचा समावेश आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध (जून 2026)
14 जून – धर्मशाला
17 जून – लखनऊ
20 जून – चेन्नई
वेस्ट इंडीज विरुद्ध (सप्टेंबर-ऑक्टोबर 2026)
27 सप्टेंबर – तिरुवनंतपुरम
30 सप्टेंबर – गुवाहाटी
3 ऑक्टोबर – चंदीगड
श्रीलंका विरुद्ध (डिसेंबर 2026)
13 डिसेंबर – दिल्ली
16 डिसेंबर – बेंगळुरू
19 डिसेंबर – अहमदाबाद
झिम्बाब्वे विरुद्ध (जानेवारी 2027)
3 जानेवारी – कोलकाता
6 जानेवारी – हैदराबाद
9 जानेवारी – मुंबई
या संपूर्ण शेड्यूलमध्ये टीम इंडियाचे अनेक कसोटी आणि टी-20 सामने असले तरी त्यामध्ये एकदिवसीय सामने कमी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रोहित आणि विराट त्यांच्या चाहत्यांना कमी वेळा मैदानात दिसणार आहेत. जर दोघेही सर्व सामने खेळले, तर पुढील वर्षभरात ते जास्तीत जास्त 12 वेळाच भारतीय मैदानांवर खेळताना दिसतील.
शेड्यूल जाहीर होताच क्रिकेट चाहत्यांनी तारीखा नोट करून ठेवल्या आहेत. विशेषतः मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथील सामन्यांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रोहित आणि विराटला लाईव्ह पाहण्यासाठी चाहते आतापासूनच तयारीला लागले असल्याचं चित्र आहे.




