14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील’; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा, ठाकरे गटावर निशाणा

14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील’; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा, ठाकरे गटावर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. 'ऑपरेशन टायगर 3.0'च्या चर्चेदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला आहे.माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "थोड 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. त्यांनी पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत,"शिंदे काही बोलत नाहीत, फक्त दाढीवर हात फिरवतात आणि ऑपरेशन यशस्वी होतं,"असा सूचक टोला लगावला.

दरम्यान, ठाकरे गटातून काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुढील काही दिवस संबंधित मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी फिरलंच पाहिजे. मुलाने केलं नाही तर बापाने ते करावंच लागतं," असा खोचक टोला त्यांनी लगावला.

याचवेळी, नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांसोबतच्या वादावरही गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगत त्यांनी शिवीगाळ किंवा गैरवर्तन योग्य नसल्याचे स्पष्ट केले."वाद होऊ शकतात, पण पत्रकारांचा सन्मान राखला पाहिजे. चूक झाली असेल तर 'सॉरी' म्हणायला काहीच हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.आता गुलाबराव पाटील यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुढे नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.