IPS विश्वास नांगरे पाटलांच्या संघ कार्यक्रमातील सहभागावरून वाद; जितेंद्र आव्हाडांचा एक वाक्यात टोला चर्चेत

IPS विश्वास नांगरे पाटलांच्या संघ कार्यक्रमातील सहभागावरून वाद; जितेंद्र आव्हाडांचा एक वाक्यात टोला चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नुकतीच नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूरमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची नवी जबाबदारी स्वीकारली आहे.दरम्यान, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहून संघ परिवाराचे कौतुक केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर काँग्रेस आणि मनसेने टीका केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर थेट सल्ला देत, “जर संघाशी एवढीच जवळीक असेल तर पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघ किंवा राजकारणात प्रवेश करावा,” असे म्हटले आहे.

याच विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे.

दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी होती. आता ते नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी एसीबीमध्ये रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, टीईटी पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवरही टीका केली आहे.