अमेरिकेने पर्शियन गल्फचं नाव बदललं, पाहा काय घडतंय?
मुंबई (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेची चर्चा फिस्कटल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरूंगरोधी जहाजं पाठवण्याची तयारी करत आहे अशी माहिती समोर येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण अमेरिका करेल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण सोडायला तयार नाही. त्यामुळे आता इथला तणाव कमालीचा वाढण्याची भीती आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने पर्शियन गल्फचं नाव बदललं आहे. अमेरिका पर्शियन गल्फला आता अरेबियन गल्फ म्हणून संबोधणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या नव्या नावाची घोषणा केली आहे. यासोबतच 'होर्मुझची सामुद्रधुनी' हे नाव वापरणेही बंद करण्यात आले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचंही नाव बदलण्याचा अमेरिकेचा घाट असल्याचं दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने प्रत्युत्तर दिलंय. बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रवेश करता येणार नाही असं इराणने स्पष्ट केलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा इराणने केलाय. तसंच होर्मुझच्या सामुद्रधुनीत येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशाने केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असंही इराणने म्हटलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत नजीकच्या काळात कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल, असं ट्रम्प म्हणाले.




