जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण जाहीर

पुणे - महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. ठाणे, पालघर, पुण्यासह राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेशिवाय पंचायत समित्यांसाठी निवडणूक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आरक्षण जाहीर झाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला जाहीर झालं आहे. 

महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी 

ठाणे -सर्वसाधारण (महिला)

पालघर - अनुसुसूचित जमाती

रायगड- सर्वसाधारण

रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग - सर्वसाधारण

नाशिक -सर्वसाधारण

धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदूरबार-अनुसूचित जमाती

जळगांव - सर्वसाधारण

अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

पुणे -सर्वसाधारण

सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली - सर्वसाधारण (महिला)

सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड -  अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली -अनुसूचित जाती

नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर - सर्वसाधारण (महिला)

अमरावती - सर्वसाधारण (महिला)

अकोला - अनुसूचित जमाती (महिला)

परभणी - अनुसूचित जाती 

वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा -सर्वसाधारण

यवतमाळ सर्वसाधारण

नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा- अनुसूचित जाती

भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया - सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)